गडचिरोली – दंडकारण्यातील माओवादी चळवळीला सुरक्षा यंत्रणेने १० डिसेंबर रोजी आणखी एक हादरा दिला. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत तब्बल ११ वरिष्ठ माओवादी सदस्यांनी आत्मसमर्पण केले. यामध्ये डिव्हिजनल कमिटी सदस्य, प्लाटून कमिटी सदस्य, एरिया कमिटी सदस्य अशी उच्च पदावरील नक्षल्यांचा समावेश असून, सर्वांवर मिळून ८२ लाखांची बक्षिसे होती.
यापैकी चार माओवादी शस्त्रांसह आणि पूर्ण गणवेशात उपस्थित राहिल्याने कार्यक्रमात कडेकोट सुरक्षा पाहायला मिळाली. या आत्मसमर्पणामुळे दंडकारण्यात माओवादी संघटनेला जबरदस्त धक्का बसला असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे. कार्यक्रमास अपर महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा,
या माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण
रमेश उर्फ भीमा उर्फ बाजू लेकामी (डिव्हीसीएम), भीमा उर्फ सितू उर्फ किरण हिडमा कोवासी (डिव्हीसीएम), पोरीये उर्फ लक्की अडमा गोटा (पीपीसीएम), रतन उर्फ सन्ना मासु ओयाम (पीपीसीएम),कमला उर्फ रागो इरिया वेलादी (पीपीसीएम), पोरीये उर्फ कुमारी भीमा वेलादी (एसीएम), रामजी उर्फ मुरा लच्छु पुंगाटी (एसीएम), सोनू पोडीयाम उर्फ अजय, प्रकाश उर्फ पांडू पुंगाटी, सीता उर्फ जैनी तोंदे पल्लो, साईनाथ शंकर मडे (AOB दलम) यांचा समावेश आहे.
Leave a comment