Home ताज्या घडामोडी गडचिरोलीत ११ जहाल माओवाद्यांचे आत्मसमर्पण; महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत टाकले शस्त्र
ताज्या घडामोडी

गडचिरोलीत ११ जहाल माओवाद्यांचे आत्मसमर्पण; महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत टाकले शस्त्र

Nagpur : दंडकारण्यात माओवादी संघटनेला गडचिरोली पोलिसांनी बुधवारी (१० डिसेंबर) आणखी एक मोठा हादरा दिला. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत एकूण ११ जहाल माओवादींनी शस्त्रांसह आत्मसमर्पण केले.

Share
Share

या माओवादींत २ डिव्हिजनल कमिटी सदस्य, ३ प्लाटून कमिटी सदस्य, २ एरिया कमिटी सदस्य आणि ४ सक्रिय सदस्यांचा समावेश आहे. चार माओवादी आत्मसमर्पणाच्या वेळी माओवादी गणवेशात होते. अपर पोलिस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक अजय शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक एम. रमेश व कार्तिक मधिरा, उपअधीक्षक विशाल नागरगोजे आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमात पोलिस महासंचालक शुक्ला म्हणाल्या, दंडकारण्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. उर्वरित माओवाद्यांनीही मुख्य प्रवाहात सामील व्हावे. प्रास्ताविक पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले, तर आभार अपर अधीक्षक एम. रमेश यांनी मानले.

आत्मसमर्पण करणाऱ्यांत यांचा आहे समावेश

आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये भामरागड, बस्तर व एओबी क्षेत्रात काम पाहणाऱ्या महत्त्वाच्या कॅडरचा समावेश आहे.
त्यात डीव्हीसीएम रमेश ऊर्फ भीमा लेकामी, किरण हिडमा, पीपीसीएम लक्की अडमा, रतन ओयाम, कमला वेलादी, एसीएम कुमारी वेलादी, रामजी पुंगाटी, सोनू पोडीयाम, प्रकाश पुंगाटी, सीता पल्लो, साईनाथ मडे या माओवाद्यांचा समावेश आहे.
६७ लाख रुपये पुनर्वसनासाठी या सर्वांना आत्मसमर्पण केल्यानंतर शासनाकडून मिळणार आहेत.

भूपतीच्या आत्मसमर्पणानंतरची सर्वात मोठी कारवाई
‎१५ ऑक्टोबर २०२५ रोजी माओवादी चळवळीतील सर्वात वरिष्ठ नेत्यांपैकी भूपती उर्फ सोनू मल्लोजुला वेनुगोपाल राव याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ६१ सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केले होते. तो धक्का अजूनही ताजा असतानाच आजचे सामूहिक आत्मसमर्पण माओवादी संघटनेसाठी आणखी मोठा हादरा ठरत आहे.

Share

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

न्याय मागणाऱ्या बळीराजावरच गुन्हा दाखल!

ग्रामस्थ म्हणतात, हा कुठला न्याय? जिल्हाभरातील नागरिकांचे प्रकरणाकडे लक्ष गडचिरोली, ता. १९...

महिनाभरापासून दहशत, तीन महिलांचा बळी ! नागरिकांच्या आंदोलनानंतर बिबट अखेर जेरबंद

Gadchiroli : आरमोरी वन परिक्षेत्रातील इंजेवारी, देऊळगाव परिसरात दहशत निर्माण करून सलग...

‘हिडमा-भीमा’ जोडीच्या दहशतीचा अध्याय संपुष्टात ! एकाचे एन्काउंटर, दुसऱ्याने केले आत्मसमर्पण

Gadchiroli : दंडकारण्यात दोन दशकांहून अधिक काळ सुरक्षा दलांवर सापळे रचून हल्ले...