Home ताज्या घडामोडी न्याय मागणाऱ्या बळीराजावरच गुन्हा दाखल!
ताज्या घडामोडी

न्याय मागणाऱ्या बळीराजावरच गुन्हा दाखल!

ग्रामस्थ म्हणतात, हा कुठला न्याय? जिल्हाभरातील नागरिकांचे प्रकरणाकडे लक्ष गडचिरोली, ता. १९ : चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथील काही शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा खोटा ठराव जिल्हाधिकारी कार्यालयात देऊन जमीन अधिग्रहण करण्याचा बोगस प्रकार सुरू असल्याची धक्कादायक माहिती मिळाली, या माहितीच्या अनुषंगाने शेतकऱ्ंयांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत न्यायाची मागणी करत निवेदन दिले.

Share
Share

ग्रामस्थ म्हणतात, हा कुठला न्याय? जिल्हाभरातील नागरिकांचे प्रकरणाकडे लक्ष
गडचिरोली, ता. १९ : चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथील काही शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा खोटा ठराव जिल्हाधिकारी कार्यालयात देऊन जमीन अधिग्रहण करण्याचा बोगस प्रकार सुरू असल्याची धक्कादायक माहिती मिळाली, या माहितीच्या अनुषंगाने शेतकऱ्ंयांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत न्यायाची मागणी करत निवेदन दिले. त्याच वेळी खोटे ठराव करणारी व्यक्ती आढळल्याने त्याला शेतकऱ्यांनी जाब विचारला तेव्हा त्याची पाचावर धारण बसली. पण खोटे काम करत असलेल्या त्या व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याऐवजी त्याच्या तक्रारीवरून न्याय मागायला आलेल्या बळीराजावरच गुन्हा दाखल करण्याचा उफराटा प्रकार घडला आहे. त्यामुळे जिल्हाभरात रोष व्यक्त होत असून चोर सोडून सन्याशाला फाशी, असा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.

जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री व संबंधित विकास विभागाच्या मंत्र्यांना निवेदन देण्याकरिता शेतकरी आले होते. निवेदन देऊन झाल्यावर अचानक फसवणूक करणारा व्यक्ती हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिज विभागात असल्याची माहिती त्यांना मिळाली. शेतकऱ्यांनी त्या व्यक्तींना थेट जाब विचारण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही प्रकारची अरेरावी न करता फक्त आणि फक्त विचारले की, आमच्या जमिनीचा ठराव देणारा तू कोण, तुला कोणी ठरवायला लावले, तू जिल्हाधिकारी कार्यालयात काय करतो आहेस, तू जिल्हाधिकारी कार्यालयाचा कर्मचारी आहेस की संबंधित कंपनीचा व्यक्ती आहे, याबाबत माहिती दे अशी त्याच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, याची दक्षता घेत या गावकऱ्यांनी त्या धनेश जुमनाके नावाच्या व्यक्तीचे व्हिडिओ चित्रिकरण केले. त्याच्यावर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याकरिता गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये गेले. मात्र हे प्रकरण आपण आष्टी पोलिस स्टेशनमध्ये दाखल करावे, असे त्यांना सांगण्यात आले. हा व्यक्ती ज्या कंपनीचा त्या कंपनीला या विषयाची भनक लागली व कंपनीने आपली सूत्रे हलवणे सुरू केले. सूत्रे हलताच गावकऱ्यांची तक्रारदेखील पोलिसांनी घेतली नाही. त्यामुळे गावकरी आपल्या गावी परतले. मात्र दुसऱ्या दिवशी ज्याला जाब विचारला त्याच व्यक्तीच्या तक्रारीवरून शेतकऱ्यांवरच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. यात गैरआदिवासी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात इतके लोकं कसे आले याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या सुरक्षारक्षकाला तसेच संबंधित विभागाच्या प्रमुखाला चांगलेच खडेबोल सुनावले. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी साहेबांनी, हे विचारले नाही की कंपनीचा माणूसदेखील तिथे काय करत होता. मात्र इतर लोकं अर्थात सामान्य नागरिक कसे आले, हे विचारत होते. त्यानंतर लगेच चार पोलिस सुरक्षा रक्षक ठेवून संबंधित विभागाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींना विचारपूस केल्याशिवाय कोणालाही आत जाण्याची मुभा दिली जात नव्हती. जिल्हाधिकारी कार्यालय हे सामान्य जनतेसाठी आहे की एका विशिष्ट कंपनीसाठी, असे प्रश्न आपले काम घेऊन आलेल्या सामान्य नागरिकांनी विचारला तसेच सदर विषयाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात हळूहळू पसरू लागली. नेमकं शासन कोणाकडून आहे हेच कळेनासे झाले आहे,असे काही सामाजिक कार्यकर्ते व बुद्धिजीवी लोकांकडूनदेखील बोलले जात आहे. त्यानंतर आज दिनांक १९ डिसेंबरला गावकऱ्यांच्या शेतजमिनीबाबत खोटा ठराव घेऊन त्यांची फसवणूक केल्याबाबतची लेखी तक्रार आष्टी पोलिस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीबाबत पोलिस उपनिरीक्षक काळे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, सदर विषयाची चौकशी करून योग्य त्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या फसवणूकीबाबत चौकशी करण्यात येईल. मात्र जाब विचारणाऱ्या शेतकऱ्यांवर कोणतीही चौकशी न करता सर्व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा विषय कितपत योग्य आहे, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. शासन- प्रशासन हे सामान्य जनतेच्या काम करण्यासाठी आहे की, त्यांना त्रास देण्यासाठी आहे, हेच आता कळत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या २०२३ पासून जुमनाके नावाची व्यक्ती जिल्हाधिकारी कार्यालयातील खनिज विभागात बिनधास्त वावरत आहे. काही लोकांचा तर गैरसमज होता होता की जुमनाके हे शासकीय कर्मचारी आहेत की काय… खनिज विभागाशी संबंधित कोणतेही पत्रव्यवहार असो किंवा कोणत्याही प्रकारची तक्रार असो किंवा कोणत्याही प्रकारचे प्रमा बिल असो मंजुरी असो, या सर्वा विषयांची माहिती सर्वात आधी जुमनाके यांना मिळत होती. जुमनाकेचा मोबाईल तपासला तर सर्व शासकीय पत्र हे त्यांच्या मोबाईलमध्ये दिसतील, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जुमनाके कंपनीचे माणूस म्हणून काम करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही लोकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आजपर्यंत जे लोक जुमनाके यांना शासकीय जिल्हाधिकारी कार्यालयाचा कर्मचारी समजत होते त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. सदर प्रकार हा गंभीर असून या प्रकरणाची योग्य अशी चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांच्यापर्यंतदेखील तक्रार गेल्याचे कळले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री साहेब या विषयावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जुमनाकेची कृष्णलीला संपुष्टात…
जुमनाके यांना कृष्णलीला करण्याकरिता स्वतःच एका तथाकथित जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवल्याचे उघडकीस आले आहे. सध्या जिल्हाधिकारी परीसरात व जिल्ह्यात घडत असलेल्या महाभारतातील जुमनाके हे एक छोटासे पात्र असल्याचे कळत आहे. त्यामुळे ही कृष्ण लीला जिल्हाधिकारी कार्यालयाला आपल्या नियंत्रीत करून नवे महाभारत घडवत असल्याची चर्चा आता चांगलीच रंगलेली आहे. विशेष म्हणजे

Share
Related Articles

महिनाभरापासून दहशत, तीन महिलांचा बळी ! नागरिकांच्या आंदोलनानंतर बिबट अखेर जेरबंद

Gadchiroli : आरमोरी वन परिक्षेत्रातील इंजेवारी, देऊळगाव परिसरात दहशत निर्माण करून सलग...

‘हिडमा-भीमा’ जोडीच्या दहशतीचा अध्याय संपुष्टात ! एकाचे एन्काउंटर, दुसऱ्याने केले आत्मसमर्पण

Gadchiroli : दंडकारण्यात दोन दशकांहून अधिक काळ सुरक्षा दलांवर सापळे रचून हल्ले...

गडचिरोलीत ११ जहाल माओवाद्यांचे आत्मसमर्पण; महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत टाकले शस्त्र

Nagpur : दंडकारण्यात माओवादी संघटनेला गडचिरोली पोलिसांनी बुधवारी (१० डिसेंबर) आणखी एक...