छत्तीसगडच्या पश्चिम बस्तर विभागातील बिजापूर–दंतेवाडा अंतरजिल्हा सीमेवर ३ डिसेंबर रोजी सकाळपासून सुरू झालेली माओवाद्यांविरोधातील निर्णायक कारवाई संध्याकाळपर्यंत सुरूच राहिली. सलग नऊ तास चाललेल्या भीषण चकमकीत सुरक्षा दलांनी मोठे यश मिळवत सात माओवाद्यांना ठार केले. मात्र, दोन धैर्यवान डीआरजी जवानांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी या चकमकीत प्राण गमावले. एक जवान जखमी झाला.
बिजापूरचे पोलिस अधीक्षक डॉ. जितेंद्र यादव यांच्या माहितीनुसार, बिजापूर व दंतेवाडीतील माओवादविरोधी विशेष पथक (डीआरजी), एसटीएफ, कोब्रा, आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त पथकाकडून ३ रोजी पहाटेपासून सर्च ऑपरेशन राबविण्यात येत होते. सकाळी नऊ वाजताच सीमेवरील घनदाट जंगल पट्ट्यात माओवाद्यांनी गोळीबार करून जवानांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.
Leave a comment